ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील अर्थसाहयाचा हप्ता मंजुरीसाठी 5000 घेताना समाज कल्याण चा कनिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात-Anti Corrapation Bureo Junior Clerk Trap

Hot Posts

6/recent/ticker-posts

ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील अर्थसाहयाचा हप्ता मंजुरीसाठी 5000 घेताना समाज कल्याण चा कनिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात-Anti Corrapation Bureo Junior Clerk Trap

धाराशिव:  ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील अर्थसाहयाचा हप्ता मंजुरीसाठी 5000 रुपयांची लाच घेताना समाज कल्याण चा कनिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात-


धाराशिव /प्रतिनिधी रूपेश डोलारे : ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील पिडीतास अर्थसाह्याचा दुसरा हप्ता बँक खात्यात जमा करण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच घेताना कनिष्ठ लिपिक समाज कल्याण धाराशिव याला एसीबीने रंगेहात पकडले आहे.रमेश मालू वाघमारे,वय- 37 वर्षे, पद-कनिष्ठ लिपिक (वर्ग 3) सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय,धाराशिव असे आरोपीचे नाव आहे ही कारवाई समाज कल्याण कार्यालय धाराशिव येथे केली.

या घटनेबाबत एसीबी कडून मिळालेली अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचे ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील अर्थसाह्य चा दुसरा हप्ता बँक खात्यात जमा करण्यासाठी दिनांक 04/12/2025 रोजी कपिल थोरात समाजकल्याण निरीक्षक यांनी 20हजार रुपये व रमेश मालू वाघमारे कनिष्ठ लिपिक, सहाय्यक आयुक्त,व समाजकल्याण कार्यालय, धाराशिव यांनी 5000  रु पैशाची मागणी केली अशा आशयाची तक्रार तक्रादार याने धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती. त्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने पडताळणी करून वरील तक्रारीच्या अनुषंगाने दिनाक 04/12/2025, 07/12/2025  व 11/12/2025 रोजी तक्रारदार हे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय धाराशिव येथे गेले असता लोकसेवक कपिल थोरात यांनी पंचांसमक्ष लाच मागणी केली नसल्याचे व रमेश वाघमारे कनिष्ठ लिपीक समाजकल्याण कार्यालय धाराशिव यांनी ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील अर्थसाह्य चा दुसरा हफ्ता बँक खात्यात जमा करणेसाठी पंचासमक्ष 5000 रु ची मागणी केले बाबतचे निष्पन्न झाले.

यामध्ये तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून केलेल्या पडताळणीत सत्यता आढळून आल्याने पंचासमक्ष दिनांक 11/12/2025 व 12/12/2025 रोजी सापळा कारवाई आजमावली असता आलोसे यास संशय आल्याने त्यांनी तक्रारदार यांचेकडून पैसे स्वीकारण्यास नकार दिला व भेट घेण्याचे टाळले.आज ३१ डिसेंबर रोजी आरोपी यास ताब्यात घेण्यात आले आहे. ही सापळा कारवाई श्रीमती, माधुरी केदार कांगणे पोलीस अधीक्षक, मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या सापळा कारवाई मध्ये   बाळासाहेब मनोहर नरवटे ,पोलीस निरीक्षक  ,पर्यवेक्षण  अधिकारी श्री. योगेश वेळापुरे, पोलीस उप अधीक्षक ,  पोलीस हवालदार आशिष पाटील, पोलीस अंमलदार विशाल डोके, जाकेर काझी, शशिकांत हजारें अप्पर पोलीस अधीक्षक यांचा समावेश होता.


▶️ आरोपी अंगझडती :-  आलोसे  रमेश मालू वाघमारे यांचे अंगझडतीत, एक होंडा ऍक्टिवा  कंपनीची स्कुटी,किंमत अंदाजे 40हजार रुपये, वन प्लस कंपनीचा  मोबाईल,किं. 10हजार रुपये व दोन पेन मिळून आल्या आहेत.

▶️ मोबाइल जप्ती :- मोबाईल हॅन्डसेट तपासणी करून आवश्यकता असल्यास जप्त करण्याची तजवीज ठेवली आहे.

                                                                   जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांचेकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी ईसम यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.

भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास 

टोल फ्री क्र:- 1064


Post a Comment

0 Comments