सोलापुर: महिलेची छेड काढणाऱ्यास आरोपीस ६ महिन्यांचा सश्रम कारावास व दंडाची शिक्षा प्रथम वर्गन्यायदंडाधिकारी यांचा निकाल
सोलापूर : येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती ऐश्वर्या जाधव यांनी दिनांक दिनांक 22/12/2025 रोजी आरोपी लक्ष्मण दत्तात्रय माळी राहणार कौठाळी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर यास लैंगिक अत्याचाराच्या गुन्हामध्ये दोषी ग्राह्य धरून. 6 महिने सश्रम तुरुंगवास व 5000/- द्रव्य दंडाची व पीडिता हीस नुकसान भरपाई म्हणून 3000/- देण्याची शिक्षा ठोठावली.
यात हकिकत अशी की, दिनांक 29/10/2023 रोजी यातील फिर्यादी ही त्यांच्या शेतामध्ये कांद्याच्या पिकात गवत काढायला गेली असता. आरोपी लक्ष्मण गवळी हा फिर्यादी शेतात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन कांद्यात खूप गवत झाली आहे असे म्हणून तिच्या उजव्या हाताला पकडून चल जाऊ तिकडे असे म्हणून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृती केले. सदर घटनेबाबत फिर्यादीने तालुका पोलीस स्टेशन सोलापूर येथे आरोपीविरुद्ध तक्रार दिली होती, त्यामुळे आरोपीविरुद्ध गु.र. नंबर 658/2023 भा. द. वि. कलम 354A प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता. यामध्ये गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक नागाबाई गंपले यांनी केला. तर केस शाबीती करिता सरकार पक्षातर्फे एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले. यामधे मूळ फिर्यादी, पंच साक्षीदार व तापसिक अंमलदार यांची साक्ष महत्वाची ठरली. सरकार पक्षातर्फे ॲड. अमोघसिद्ध कोरे सहा. सरकारी अभियोक्ता यांनी काम पाहिले. तर कोर्ट पैरवी म्हणून तालुका पोलीस स्टेशन सोलापूर येथील पो हे काँ श्री. सुरेश राठोड यांनी काम पाहिले.

0 Comments