इटकळ येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; मुद्देमाल जप्त एक जणांवर गुन्हा दाखल-
धाराशिव: तुळजापूर तालुक्यातील ईटकळ येथे कल्याण मटका जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून एक जणांवर नळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईटकळ येथे अवैध धंदे प्रमाणावर सुरू असल्याची तिसरा असल्याची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. तसेच बालाघाट न्यूज टाइम्स चैनलने वेळोवेळी बातमी प्रसिद्ध करून पाठ पुरावा केला होता याची दखल घेत पोलीस प्रशासनाने अखेर अवैध धंदे चालकावर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे या कारवाईमुळे अवैध धंदे चालकाचे धाबे दणाणले आहेत.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की तुळजापूर तालुक्यातील ईटकळ येथे जुगार विरोधी कारवाई दरम्यान नळदुर्ग पोलीसांनी दि.25.12.2025 रोजी 16.00 वा. सु. वाशी पो ठाणे हद्दीत केशेगाव रोडलगत प्रसाद फुटवेअर बाजूला इटकळ येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-खंडेराव कल्लाप्पा कांबळे, वय 45 वर्षे, रा. केशेगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव 16.00 वा. सु. केशेगाव रोडलगत प्रसाद फुटवेअर बाजूला इटकळ येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 540 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले नळदुर्ग पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

0 Comments