बीड :भाजीपाला देण्याच्या बहाण्याने एका ३५ वर्षीय विधवा महिलेवर लैंगिक अत्याचार ;नराधम आरोपीस अटक गुन्हा दाखल -
बीड : केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे हद्दीत एका 57 वर्षीय नराधमाने त्यांच्या मुलीच्या वयाचे एका ३५ वर्षीय विधेवर लैंगिक अत्याचार केल्याची असल्याची खळबळजळणी घटना घडली आहे .याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात नराधम आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलीसांकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक 24 रोजी युसुफवड गाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सावळेश्वर पैठण येथील मधुकर उर्फ मदन विश्वनाथ मस्के वय 57 वर्षीय नराधमाने एका 35 वर्षीय विधवा महिला शेतातील भाजीपाला घेऊन जा असे म्हणून शेतात बोलवले सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ते विधवा महिला शेतात गेली असता तेथे कोणी नसल्याचा व असहाय्यतेचा फायदा घेत मधुकर उर्फ मदन विश्वनाथ मस्के वय 57 यांनी तिच्याशी जवळीक साधून तिच्यावर अतिप्रसंग करून बळजबरीने बलात्कार केला .
तसेच याचे वाच्यता केली किंवा कोणाला जर सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली दरम्यान पिडीतेने तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याच्याशी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात मधुकर व मदन विश्वनाथ मस्के यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 326 / 2025 भारतीय न्याय संहिता कलम 64 75 76 78 79 115 233 351 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .प्रभारी अधिकारी मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भीमराव मांजरे हे तपास करीत आहेत.
पोलिसांनी काही तासातच आरोपीला ठोकल्या बेड्या
सदर घटना गंभीर स्वरूपाची असल्याने गुन्हा दाखल होतास सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भीमराव मांजरे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमजद सय्यद आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल मोरे यांनी शिताफीपतीने एका तासात आरोपीचा शोध घेऊन त्याला त्याब्यात घेतले
नराधमाला पोलीस कोठडी
मुलीच्या वयाच्या 35 वर्षे विधवा महिलेवर करणारा मधुकर उर्फ मदन मस्के याला न्यायालयाने दिनांक 26 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

0 Comments