लग्नाचे आमिष, लैंगिक अत्याचारासाठी २० वर्षीय तरुणीस डांबुन ठेवले; एकावर गुन्हा दाखल धाराशिव जिल्ह्यातील घटना-
धाराशिव : परंडा तालुक्यातील एका गावातील २० वर्षीय तरुणीस फुस लावून पळवून नेत अत्याचार करण्यासाठी डांबुन ठेवल्या प्रकरणी गावातीलच एका तरुणाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे .ही घटना दिनांक १९ रोजी घडली आहे.
याप्रकरणी परंडा पोलिसात मुलीच्या आईने दिलेल्या दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की परंडा पोलीस ठाणे अंतर्गत एका गावातील वीस वर्षे मुलीस गावातील एका तरुणांनी दवाखान्यात बोलवून घेतले त्यानंतर तिला पोस्ट लावून किंवा लग्नाची आमची दाखवून लैंगिक अत्याचारासाठी तिला अज्ञात ठिकाणी डांबुन ठेवल्याचे म्हटले आहे त्यानुसार परंडा पोलिस ठाण्यात भा.न्या.सं.कलम-137, 138, 87, 128, 64,351 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास परांडा पोलीस करत आहेत.

0 Comments