शेतीच्या वादाच्या कारणावरून डोळ्यात मिरची पूड टाकून महिलेस बेदम मारहाण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल तुळजापूर तालुक्यातील घटना-
धाराशिव : शेतीच्या वादातून एका महिलेस डोळ्यात मिरची पूड टाकून लाथा बुक्क्या काठीने मारहाण करत जखमी करण्यात आल्याची गंभीर घटना दिनांक 25 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील वागदरी शिवारात घडली असून याप्रकरणी पाच जनाविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की,आरोपी नामे- जितेंद्र सुरेश पाटील, रवींद्र सुरेश पाटील, सुधाकर नरसिंग बिराजदार, ज्योती जितेंद्र पाटील, सुनिता पाटील सर्व रा. वागदरी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.25.12.2025 रोजी 1.30 वा. सु. शेत गट नं 124 मध्ये वागदरी शिवार येथे फिर्यादी नामे-पदिमनी निवृत्ती बिराजदार, वय 40 वर्षे, रा. वागदरी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतीच्या वादाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन मिरची डोळ्यात टाकून जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-पदिमनी बिराजदार यांनी दि.26.12.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे नळदुर्ग येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 352, 351 (3), 189, 189(4), 191(3), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास नळदृग पोलीस करत आहेत

0 Comments